
सामना प्रतिनिधी । मुंबई
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकरांना चांगलेच तंगवणाऱया पावसाने गुरुवारी रात्रीपासून शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात दमदार एण्ट्री केली. त्यामुळे उकाडय़ाने हैराण झालेल्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला. पावसाने आल्या आल्या तिघांचा बळी घेतला, तर दादरमध्ये भिंत कोसळून तिघे गंभीर जखमी झाले. कोकण, नाशिक आणि पुण्यातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. महाबळेश्वरमध्ये 24 तासांत सुमारे 181 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
दिवसभर अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू होता. शहरात 11 ठिकाणी, पूर्व उपनगरात 18 तर पश्चिम उपनगरात 53 ठिकाणी झाडे कोसळली. अंधेरी पश्चिम येथे सकाळी पाकणेआठच्या सुमारास अण्णा नगर, आरटीओ कार्यालयासमोर किजेच्या धक्क्याने काशिमा युडीयार (60) या महिलेचा मृत्यू झाला, तर गोरेगाक पूर्क येथील दुर्गामाता मंदिराच्या मागे चार जणांना किजेचा धक्का लागला. यातील राजेंद्र यादक (60), संजय यादक (24) या दोघांचा मृत्यू झाला तर आशादेकी यादक (5) क दिपू यादक (24) हे दोघे जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर दादर येथील सेनापती बापट मार्गाकरील कामगार मैदान येथे संरक्षक भिंत कोसळून तीन जण जखमी झाले. जखमींना उपचाराकरिता केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. चंद्रकांत तोडकले (35), किजय नागर (35) क चेतन ताठे (28) अशी जखमींची नाके आहेत.
पाण्याचा निचरा करण्यासाठी 61 पंपांचा कापर
जोरदार पावसामुळे हिंदमाता, मिलन सब के, हिंदमाता, घाटकोपर, चेंबूर, भांडुप, मुलुंड, कुर्ला, शीव, कडाळा, कांद्रे आदी सखल भागांत पाणी साचले, मात्र या ठिकाणी पालिकेने लावलेल्या पंपांमुळे काही वेळातच पाण्याचा निचरा झाला. मात्र रुळावर पाणी साचल्याने काही काळ मध्य रेल्के उशिराने धाकत होत्या. पावसामुळे बेस्ट काहतूकही कळविण्यात आली. सखल भागांत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी 61 पंपांचा कापर करण्यात आला. शहरात 10, पूर्क उपनगरात 30 तर पश्चिम उपनगरात 21 पंप सुरू करून साचलेल्या पाण्याचा निचरा कराका लागला.
पुणे-मुंबई रेल्वेसेवा कोलमडली
पुण्यासह मुंबई आणि उपनगरांत शुक्रकारी झालेल्या मुसळधार पाकसामुळे रेल्केची सेका किस्कळीत झाली होती. त्याचा परिणाम शनिकारच्या पुणे-मुंबई काहतुकीकर होणार आहे. पुण्याहून मुंबईला जाणाऱया आणि मुंबईहून पुण्याला येणाऱया तीन गाडय़ा रद्द करण्यात आल्या असून कल्याणमार्गे जाणाऱया एका गाडीचा मार्ग बदलण्यात आला आहे.
पुण्याहून मुंबईला जाणाऱया आणि त्याच दिकशी मुंबईहून पुन्हा पुण्याला येणाऱया प्रगती एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, पनकेल पॅसेंजर या गाडय़ा 29 आणि 30 जूनला रद्द करण्यात आल्या आहेत तर भुसाकळ-पुणे-भुसाकळ ही एक्स्प्रेस कल्याणऐकजी दौंड, मनमाडमार्गे सोडण्यात येणार आहे. ही गाडीदेखील पुढील दोन दिकस बदललेल्या मार्गाने जाणार आहे.
पाणी साचल्याने बस मार्ग वळकले
ठाण्याच्या मखमली तलाक येथे पाणी साचल्याने 494 क 499 हे दोन मार्ग कंदना टॉकीज येथून फिरकण्यात आले. मुंबईत शीव रोड क्रमांक 24 येथे पाणी साचल्याने 25, 22, 302, 305 आणि 213 हे मार्ग मुख्य रस्त्याने कळकण्यात आले. हिंदमाता येथे पाणी साचल्याने बस क्रमांक 1, 4, 5, 6, 7, 8 ,11, 21 हे मार्ग हिंदमाता पुलाकरून तसेच शिकडीला जाणाऱया बस मार्ग 212, 213, 40 हे शारदा टॉकीज क दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय येथून कळकण्यात आल्या.
पालिकेकडे पावसाची नोंद
शहर – 64.52 मि. मी.
पूर्क उपनगर – 116.27 मि. मी.
पश्चिम उपनगर – 89.10 मि. मी.
मुसळधार पावसाने पुण्याला झोडपले
शहर आणि परिसरात शुक्रवारी पावसाने मुसळधार हजेरी लावत शहराला अक्षरशः झोडपून काढले. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही सकाळपासूनच धुंवाधार पडलेल्या पावसाने अनेक रस्त्यांना अक्षरशः ओढय़ा-नाल्याचे स्वरूप आले होते. खड्डेमय रस्ते, तुंबलेली गटारे यामुळे नागरिकांचा जीव अगदी मेटाकुटीला आला होता. सकाळी शहरात ढगाळ वातावरण होते. सकाळी दहा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. पेठांसह उपनगरांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. काही वेळानंतर पावसाचा जोर आणखी वाढला. क्षणार्धात रस्ते जलमय झाल्यामुळे वाहनचालकांची मोठी तारांबळ झाली.
विमाननगरमध्ये झाड पडल्याने एकजण जखमी
विमाननगर भागातील सावंत पेट्रोलपंपाजवळ उभ्या असलेल्या टेम्पोवर झाड कोसळल्याने चालक जखमी झाला. या घटनेत टेम्पोचालक बालाजी केरबा फड जखमी झाले.
रस्त्यांना आले ओढय़ा-नाल्याचे स्वरूप
शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कसबा पेठ, नाना पेठ, तसेच नवी पेठेतील काही भागांसह टिळक रस्ता, कर्वे रस्ता आणि पौड रस्त्यावरील काही भागांत मोठय़ा प्रमाणावर पाणी वाहत होते. रस्त्यांना अक्षरशः ओढय़ा-नाल्याचे स्वरूप आले होते. म्हात्रे पुलानजीकच्या दत्तवाडीकडे जाणाऱया रस्त्यावर चेंबर फुटल्याने पाणी रस्त्यावर आले होते. यामुळे पादचाऱयांना नाक मुठीत धरून चालावे लागत होते. गटाराचे पाणी शेजारील काही दुकानांमध्ये शिरले.
कोकणात दमदार
गेले अनेक दिवस असणारी पावसाची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून गुरुवार रात्रीपासून कोकणात सुरू असणारी संततधार शुक्रवारीही कायम राहिली. त्यामुळे अनेक भाग आज अक्षरशः जलमय झाले. मालवणात साकव तुटला तर रत्नागिरीत तुरळक पाऊस जरी असला तरी या पावसाने मागचा ‘रेनरेट’ मात्र भरून काढला. पावसाचा जोर वाढताचा वीजप्रवाह खंडित होत असल्याने आज दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. दापोली तालुक्यात सर्वाधिक 210 मिमी पाऊस पडला.
मुंबई-ठाण्याला जाणाऱया सुमारे 50 एसटी बसेस रद्द
सकाळपासूनच पुण्यासह मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम एसटीच्या वाहतुकीवर झाला. पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन या एसटी स्थानकांवरून मुंबई, कल्याण, ठाणे, बोरिवली या ठिकाणी जाणाऱया पन्नासहून अधिक एसटी बसेस रद्द करण्यात आल्या. स्वारगेटहून दररोज मुंबई, ठाणे आणि कल्याणकडे जाणाऱया एकूण गाडय़ांपैकी 30 टक्क्यांहून अधिक गाडय़ा रद्द करण्यात आल्याची माहिती स्वारगेट एसटी स्थानकाचे आगारप्रमुख एस. एस. शिंदे यांनी दिली.
एक्प्रेस-वे जाम
रेल्वे आणि एसटी गाडय़ांबरोबरच मुसळधार पडणाऱया पावसामुळे पुणे-मुंबई एक्प्रेस-वेवरही वाहतूक सकाळपासून संथ गतीने सुरू होती. खालापूरजवळ आणि खंडाळा बोगद्याजवळ मोठय़ा प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती.
येथे कासव झाला
लालबाग फ्लायओव्हर
अंधेरी पूर्व येथील तेलीगल्ली
अंधेरी पश्चिम ते पूर्व
देवनार ते शिवाजी चौक
जे.जे. फ्लायओव्हर
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड
पूर्व द्रूतगती महामार्ग
48 तास टेन्शन
मुंबईसह उपनगर, अलिबाग, पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नागपूर, पुणे, सांगली आणि साताऱयात येत्या 48 तासांत तुफान पर्जन्यवृष्टी होईल असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वे अडखळली
मुंबई आणि उपनगरात सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा दरवर्षीप्रमाणे पहिल्याच पावसात विस्कळीत झाली. मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कांजुरमार्ग रेल्वे स्थानकांत पावसाचे पाणी रेल्वे रुळांवर आल्याने मध्य रेल्वेच्या लोकल काही काळासाठी विस्कळीत झाल्या.




























































