इराणवर युद्धाचे ढग, कतारमध्ये अमेरिकेची फायटर विमाने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। वॉशिंग्टन

इराण आणि अमेरिकेतील तणाव गेल्या काही दिवसांत मोठय़ा प्रमाणावर वाढला असून इराणवर युद्धाचे ढग गडद होण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेने कतारमध्ये पहिल्यांदाच एफ-22 स्टेल्थ फायटर विमाने तैनात केल्याने कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अमेरिकन सैन्य आणि देशहिताच्या रक्षणासाठी एफ-22 स्टेल्थ विमाने तैनात केल्याचे अमेरिकन एअर फोर्सच्या केंद्रीय लष्करी कमांडकडून सांगण्यात येते.

एफ-22 ची नेमकी किती किमाने तैनात केली ते स्पष्ट केलेले नाही. कतारची राजधानी दोहा परिसरातील अल उदीद एअर बेस येथून पाच लढाऊ विमानांनी उड्डाण केल्याची माहिती पुढे आली आहे.

मागच्या आठवडय़ात इराणने अमेरिकेचे हेरगिरी करणारे ड्रोन विमान पाडल्यानंतर दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे.