कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, साकीनाका पोलिसांची इराणीपाड्यात धाडसी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
police

सामना प्रतिनिधी । मुंबई

कल्याणच्या इराणी वाडीत कारवाईसाठी गेलेल्या साकीनाका पोलिसांच्या विशेष पथकावर दगडफेक झाल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी जाफर अली आरीफ अली सय्यदला अटक करण्यात आली. त्याच्या अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

इराणी टोळी ही ज्येष्ठ नागरिकांना पोलीस असल्याची बतावणी करून टार्गेट करते. कल्याणच्या इराणी वाडीत चार संशयित राहत असल्याचे पोलिसांना कळले. वरिष्ठ निरीक्षक किशोर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील माने, उपनिरीक्षक राजेश जगदे, संदीप साळुंखे, जय पालवे यांच्यासह पोलिसांचे पथक तयार केले. शनिवारी सायंकाळी पोलिसांचे पथक इराणी वाडीत कारवाईसाठी गेले. तेव्हा 35-50 जण जमले. त्यांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. पोलिसांनीदेखील प्रत्युत्तर दिले. अखेर खडकपाडा पोलिसांची मदत घेण्यात आली. या घटनेनंतर चार आरोपींनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी जाफर अलीला पकडले.