मुंबई विद्यापीठाच्या 2 जुलै रोजी होणाऱ्या परीक्षा रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई विद्यापीठशी संलग्न सर्व महाविद्यालयाच्या आज, मंगळवार दिनांक 2 जूलै 2019 रोजीच्या लेखी आणि प्रात्यक्षिक दोन्ही परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहे. मुंबई-ठाणे परिसरात सुरू असलेल्या मुसळधारा पावसामुळे राज्यशासनाकडून मुंबई-ठाणे जिल्ह्यात सुट्टी जाहीर करण्यात आली. त्यानंतर मुंबई विद्यापीठाने तात्काळ पत्रक काढून मंगळवारी होणाऱ्या परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तसेच या परीक्षेंच्या नविन सुधारित तारखा लवकरच विद्यापीठ संकेतस्थळ तसेच प्रेस नोटद्वारे प्रसिद्ध करण्यात येतील, असेही सांगण्यात आले आहे.