मराठवाडा वॉटर ग्रीड योजना सर्वव्यापी करा: राज्यमंत्री खोतकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जालना

मराठवाड्याच्या इतिहासात क्रांतिकरी बदल घडवून आणणारी मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजना सर्वव्यापी करण्याची विनंती राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना केली.

महाराष्ट्रातील इतरत्र वाहून जाणारे पाणी हे मराठवाड्यातील धरणांमध्ये नियोजन करून वळवावे व मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमचा सोडवावा, अशी सूचना राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केली असून जालना हे औद्योधिक शहर असून भविष्यात संभाजीनगर, जालना ही शहरे जुळी शहरे निर्माण होतील. यासाठी जालना शहरासाठी पिण्याच्या व औद्योगिक वापराच्या पाणी नियोजनाची आवश्यकता असल्याचे खोतकरांची नमूद केले.

मराठवाड्यातील दुधना, गोदावरी, पूर्णा, मांजरा, वाकी, सोमठाण या नद्यांमध्ये वॉटर ग्रीडच्या माध्यमातून नियोजन करावे. जालना शहराची ६० एम एल डी पाण्याची आवश्यकता पाहता व जालना मतदार संघाची व्याप्ती बघता वॉटर ग्रीडमध्ये जालना शहराचे नियोजन करावे, असेही राज्यमंत्री खोतकर यांनी म्हटले आहे.