
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
जगभरात सर्वाधिक वापरली जाणारी व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम ही सोशल माध्यमं ठप्प झाली आहेत. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे फोटो, व्हिडीओ डाऊनलोड करण्यास अडचण येत आहे. जगभरातून कोट्यवधी युझर्सने याबाबत तक्रार केली आहे. बुधवार सायंकाळपासून ही समस्या निर्माण झाली आहे.
बुधवारी सायंकाळपासून व्हॉट्सअप, फेसबुक, मेसेंजर आणि इन्स्टाग्रामवर फोटो डाऊनलोड करताना अडचण येत आहे. सुरुवातीला नेटची समस्या फोटो, व्हिडीओ डाऊनलोड होत नसावी असे वाटले, परंतु सर्वच सोशल माध्यमांवर ही समस्या दिसून आल्यानंतर सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती मिळाली. इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप फेसबुकशी जोडले गेलेले असल्याने याचा प्रभाव सर्वच सोशल साईटवर पडला आहे.
दरम्यान, सोशल माध्यमांवर सध्या #WhatsAppDown #facebookdown #instagramdown हॅशटॅग वापरून शेकडो ट्वीट करण्यात आले आहेत. काहींनी मजेशिर ट्वीट करून याचाही आनंद लुटला आहे.
Been turning on data and wifi thousand times, just to realize #whatsappdown #facebookdown #instagramdown
Smh pic.twitter.com/KUN5BKUHLX— Racine Bertin Mugisha (@RacineBertin) July 3, 2019
Welcome queen twitter
Twitter rules the world ….#whatsappdown pic.twitter.com/UEle3T4TEX— Temi_Tope (@MOlorunjuedalo) July 3, 2019
how many times did you’ll restart your phones? #whatsappdown pic.twitter.com/V6AXUghW3f
— Tlhogi (@hlouks_ell) July 3, 2019




























































