विठ्ठल रखुमाईच्या 24 तास दर्शनाला सुरूवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vitthal-temple-pandharpur

सामना ऑनलाईन, पंढरपूर

12 जुलै रोजी पंढरपुरात आषाढी वारीचा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्याला आठवडाभराचा अवधी असला तरी गेल्या काही दिवसांपासून पंढरी नगरी वारकरी भाविकांनी फुलून गेली आहे. वाढती गर्दी लक्षात घेता आलेल्या भाविकांना सुलभतेने आणि लवकर दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीने श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन आजपासून म्हणजेच 4 जुलैपासून 24 तास सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, यांचे हस्ते विधीवत पूजा करून “श्रीं”चा पलंग काढण्यात आला आणि “श्रीं”च्या आरामासाठी मुर्तीच्या पाठीमागे मखमली लोड लावण्यात आला आहे. या प्रसंगी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, लेखाधिकारी सुरेश कदम  उपस्थित होते