गोवंडीत इमारत कोसळली, आठ जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

गोवंडीमध्ये शिवाजी नगर येथील इमारत कोसळी असून त्यात आठ जण जखमी झाले आहेत. रविवारी रात्री सवा दोन वाजता ही घटना घडली. यातील तीन जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

झुबेदा बेगम सय्यद (70), आयेशा बानू सय्यद (21), नूरजहान बानू सय्यद (45) अशी या रुग्णालयात दाखल केलेल्या जखमींची नावे आहेत. उर्वरित पाच जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे.