
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमवर न घेता मतपत्रिकांद्वारेच घेण्यात याव्यात या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली.
लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघांमध्ये घोळ असून जेवढय़ा लोकांनी मतदान केले आहे त्यापेक्षा जास्त मतदान नोंदवले गेले आहे. त्यामुळे पुन्हा मतपत्रिकेवर मतदान घेतले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली तर ईव्हीएमची चीप अमेरिकेहून येत असेल तर हॅकिंगची शक्यता आहे असे त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही दिल्लीत भेट घेतली.
























































