प्रभू वैजनाथाचे चांदीचे अलंकार काढले, भक्तांना झाले निजरूप दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, परळी

बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैजनाथाला घालण्यात आलेले चांदीचे अलंकार काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2014 सालापासून वैजनाथाला हे अलंकार घालण्यात आले होते. या अलंकारांमुळे भक्त नाराज होते सांगण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी होत चाललं आहे.

vaijnath-jyotirlinga

प्रभू वैजनाथाला घालण्यात आलेल्या चांदीच्या अलंकारांमुळे पाऊस कमी झाल्याचे अनेक भक्तांना वाटत आहे. याबद्दल भक्तांनी मंदिर प्रशासनाला कळवल्यामुळे अखेर हे अलंकार काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळतंय.

parali-vaijnath-mandir

काही दिवसांपूर्वी महिला भक्तांनी प्रभू वैजनाथाला घातलेले हे चांदीचे कवच काढण्यासाठी निवेदन दिले होते. शनिवारी वैद्यनाथच्या मंदिरात भाविकांना चांदीच्या अलंकारशिवाय प्रभू वैद्यनाथाचे दर्शन झाले. या महिला भक्तांनी केलेल्या निवेदनाची दखल घेत हे अलंकार काढल्याचे सांगितले जात आहे. मार्च महिन्यात श्रृंगेरी पीठाचे शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती महास्वामीजी यांनी प्रभू वैद्यनाथाला निजरूपात रुद्राभिषेक केला होता.