
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईत एका स्क्रिप्टरायटरला एका तरुणाने व्हिडीओ कॉल करून अश्लील वर्तवणूक केली आहे. त्या तरुणाने व्हिडीओ कॉलवरच हस्तमैथून करण्यास सुरुवात केल्याने तरुणीने याबाबत खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ऑनलाईन हस्तमैथून करून तरुणीचा विनयभंग करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसरा रविवारी पहाटे साडे चारच्या सुमारास ती झोपलेली असताना स्काईपवर तिला व्हिडीओ कॉल आला. तो कॉल तिने उचलला असता समोरील व्यक्ती हस्तमैथून करत होता. पीडित तरुणीने त्याचे फोटो काढले व कॉल कट केला. त्यानंतर तिने ट्विटरवरून याबाबत तक्रार केली व दुसऱ्या दिवशी खार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.




























































