विज प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी क्षीरसागरांनी घेतली ऊर्जामंत्र्यांची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

बीड जिल्ह्यामध्ये विजेच्या प्रश्नावर निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी रोहयोमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन अनेक प्रलंबीत प्रश्नावर तातडीने मार्ग काढण्यासाठी पर्याय सुचवले. क्षीरसागरांच्या भेटीनंतर उपस्थित केलेल्या विज प्रश्नावरील समस्या तातडीने दुर करण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले.

मंगळवारी रोहयोमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. जुलै ते सप्टेंबर पर्यंत 350 ट्रन्सफार्मर बीड जिल्ह्यासाठी मंजूर करुन घेतले. बीड शहरातील मुख्य विद्युत धारेला पाचव्या तारेला अतिरिक्त वायर टाकण्यासाठी टायमरच्या योजनेस मंजूरी मिळवली.बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी सौभग्य योजनेतून 33 वस्तीसाठी विद्युत तार आणि ट्रन्सफार्मर मंजूर करुन घेतले. नेकनूर, पाली, बेलखंडी, शिरुर तालुक्यातील वारणी येथे जागा उपलब्ध असल्याने तातडीने सबस्टेशन मंजूर करण्याची मागणी केली. शहरातील वसंतराव नाईक पुतळया जवळील डीटीसी व इतर ठिकाणच्या रस्त्यावर आलेले पोल लोकांच्या घरावरुन गेलेल्या तारा तातडीने शिफ्ट करण्याची मागणी केली.सध्या कृषी पंपाची जोडणी पारंपारीक पद्धतीने करण्यात आली आहे.त्यांना सुद्धा सौर ऊर्जा सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच पावरग्रीड कॉर्परेशन ऑफ इंडिया या कंपनीद्वारे सोलापुर, संभाजीनगर हायवेवर 765 केव्ही उच्चदाब विद्युत मनोरा व वाहीनेचे काम पुर्ण झाले त्याचा शेतकऱ्यांना वाढीव मावेजा देण्यात यावा आशा मागण्या जयदत्त क्षीरसागर यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या कडे केल्या आहेत. या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.