डहाणू तलासरीला भूकंपाचे धक्के, घर कोसळून एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
earthquake-measurement

सामना ऑनलाईन, ठाणे

पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. गुरुवारी पहाटे दीडच्या सुमारास हे धक्के बसायला सुरूवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत 5 ते 6 धक्के जाणवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. या भूकंपामुळे डहाणूतील नागझरी गावातील एक घर कोसळले असून यात त्या घरातील 55 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल आहे. रिष्या मेघवाले असे त्या महिलेचे नाव आहे.

यातील सगळ्यात मोठा धक्का हा 3.8 रिश्टर स्केलचा होता. हा आजवरचा या भागाला बसलेला सगळ्यात मोठा धक्का आहे.