बिहारमध्ये चकमकीदरम्यान तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पाटणा

बिहारमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. मृत नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे जप्त करण्यात आली आहे.

बिहारच्या नाडिया जिल्ह्यात नक्षलवादी लपल्याची खबर सुरक्षा दलाला मिळाली होते. त्यामुळे कोबरा, सीआरपीएफ आणि एसटीएफच्य संयुक्त टीमने शोध मोहीम राबवली. या शोधमोहीमेदरम्यान नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलानेही गोळीबार केला. त्यात तीन नक्षलवादी मारले गेले व इतर पळून जाण्यात यशस्वी झाले.

सुरक्षा दलाने मृत नक्षलवाद्यांकडून एक एके 47, 3 रायफल आणि मोठ्या प्रमाणात हत्यारे जप्त केली आहे. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटलेली नाही.