
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
कोकण रेल्वे मार्गावरील वीर-माणगाव दरम्यान शनिवारी सकाळी घोड नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली होती. तीन तासानंतर पुन्हा वाहतूक सुरु झाली असून कोकण रेल्वेच्या गाड्या धीम्या गतीने धावत आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या चार गाड्या थांबविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ५०१०४ रत्नागिरी -दादर पॅसेंजर ही गाडी वीर स्थानकात, ५०१०५ दिवा-सावंतवाडी पॅंसेजर ही गाडी कोलाड येथे, १२६१७ एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्सप्रेस करंजाडी येथे तर १०१०३ मांडवी एक्सप्रेस ही गाडी रोहा येथे थांबविण्यात आल्या होत्या.



























































