
सामना प्रतिनिधी । चंद्रपूर
शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा येथे भव्य रक्तदान व सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून माननीय प्राध्यापक डॉक्टर कुणाल काळे सर, प्राचार्य आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन.
अध्यक्ष म्हणून वरोरा शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर राजेंद्रजी ढवस तथा प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध डॉक्टर विवेक जी तेला तसेच वरोरा रोटरीचे माजी अध्यक्ष माजी उपप्रांतपाल समीर जी बार ई उपस्थित होते. या शिबिराचे आयोजन शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख नितिन मते यांनी केले होते.


























































