कोकणात अतिवृष्टीचा इशारा, गटारी करणाऱ्या “प्या”रेलालांना अर्लट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

आज रविवार असल्यामुळे सर्वत्र गटारीचा माहोल आहे.गटारी साजरी करण्यासाठी अनेकांनी प्लान बनवले आहेत. मात्र कोकणात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पडझड सुरु आहेत अशा वातावरणात गटारी साजरा करणाऱ्यां ‘प्या’रेलालांना सर्तकता बाळगावी लागणार आहे.

आषाढ महिन्यातील आज शेवटचा रविवार असल्यामुळे गटारी साजरी करण्यात येत आहे.गटारी निमित्त चिकन,मटणाचे दर वाढले आहेत.गावठी कोंबड्या 400 रूपये किलो, बॉयलर, लेगॉन 130 रूपये किलो, मटण 520 रूपये किलो दराने विकले जात आहे. चिकन-मटणाच्या दुकानात सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. “प्या”रेलाल मंडळींनी गटारीचे स्पेशल प्लान बनवले अाहेत.मात्र कोकणात सुरु असलेल्या अतिवृष्टीत अनेक ठिकाणी दरडी कोसळणे,रस्ता खचणे तसेच पूरस्थिती निर्माण होत आहे अशावेळी गटारी साजरी करणाऱ्यांना सर्तकता बाळगावी लागणार आहे.