दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणातून पाणी वळविणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

कोकणातील नार-पार, दमणगंगा, उल्हास व वैतरणा या खोऱयांलगत असलेल्या मराठवाडय़ातील गोदावरी नदी खोऱयातील पुणे, गंगापूर, वाघाड, करंजकण, भंडारदरा, मुळा, वडका, मुखणे, भाकली इत्यादी धरणांच्या पाणलोट खोऱयात पाणी वळविण्यात येणार आहे. याच मार्गाने पुढे मराठवाडय़ातील जायकवाडी धरणापर्यंत पाणी पोहोचू शकेल. तहानलेल्या दुष्काळग्रस्त मराठवाडय़ाला दिलासा देणाऱया प्रस्तावित नदीजोड प्रकल्पाचे सादरीकरण मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत झाले. यावर झालेल्या चर्चेअंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाबाबत पुढील कार्यवाही करण्यास मान्यता दिली.

आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व राज्यांतर्गत नार-पार-गिरणा, पार गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदाकरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी हे नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून न घेता राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राज्याच्या निधीतून त्वरित हाती घेण्यात यावेत. या नदीजोड प्रकल्पांमुळे मुंबई शहरासाठी 31.60 अब्ज घनफूट, गोदावरी खोऱयातील मराठवाडा भागात 25.60 अब्ज घनफूट व तापी खोऱयासाठी 10.76 अब्ज घनफूट पाणी कोकणातून उपलब्ध होईल. तसेच पूर्व विदर्भात खोऱयातील अतिरिक्त पाणी नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्ह्यांसाठी वळविण्याचे प्रस्तावित आहे.

प्रकल्पासाठी स्वतंत्र मुख्य अभियंता नेमणार
दमणगंगा-पिंजाळ, नार-पार-गिरणा, पार-गोदाकरी, दमणगंगा-कैतरणा-गोदाकरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी या नदीजोड प्रकल्पांचे कार्यक्षत्र तीन महामंडळांत विभागले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजाकणीत समन्वय व एकसूत्रीपणा राखण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. ही शक्यता लक्षात घेता या नदीजोड प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मुख्य अभियंता कार्यालय स्थापन करणे आवश्यक होते. त्यामुळे मुख्य अभियंता (नदीजोड प्रकल्प) पदाची पदनिर्मिती करून हे प्रकल्प हाती घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे प्रकल्पांची मिशन मोडकर गतिमान अंमलबजावणी करणे शक्य होईल.

140 अब्ज घनफूट पाणी गोदावरीत वळवणार
कोकणाच्या पश्चिमवाहिनी नदीखोऱयातील उल्हास, वैतरणा, नार-पार व दमणगंगा खोऱयात एकूण 360 अब्ज घनफूट अतिरिक्त पाणी उपलब्ध आहे. हे अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱयात कळविणे शक्य आहे. त्यासाठी नवीन नदीजोड योजनांचे सविस्तर सर्वेक्षण व अन्वेषण त्वरित हाती घेऊन व्यवहार्य योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहेत. अशा एकूण 140 अब्ज घनफूट पाणी वळविण्यासाठीच्या योजनांची निवड जलसंपदा विभागाने प्रस्तावित केली आहे.