रत्नागिरी तालुक्यातील चांदोर व तळीवाडी गावात घरांवर झाडे पडून प्रचंड नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी तालुक्यांतील चांदोर व तळीवाडी गावात दोन ठिकाणी घरावर नारळाचे आणि आंब्याची झाडे पडून घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

सलग तिसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजापूर, चिपळूण, खेड आणि चांदेराई येथे आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे.

मिऱ्या येथील धूपप्रतिबंधक बंधारा समुद्राच्या लाटांनी गिळंकृत केला असल्यामुळे मिऱ्या किनाऱ्यावरील लोकवस्तीत पाणी शिरत आहे.समुद्राच्या लाटांनी अर्धा रस्ता वाहून गेला आहे.