
सामना प्रतिनिधी । बीड
बीडमध्ये सुरू असलेल्या उमरखेड येथील माधवानंद महाराजांच्या चातुर्मास स्थळी आज दीप अमावस्या निमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मोठ्या प्रमाणात भक्त, शिष्य उपस्थित होते.
दीप अमावस्या निमित्त बीड मध्ये सुरू असलेल्या उमरखेड संस्थानचे माधवानंद महाराज यांच्या चातुर्मास कार्यक्रमात सायंकाळी दीपोस्तव साजरा करण्यात आला. तब्बल पाच हजार दिव्याची आरास लावण्यात आली या प्रकाशातच प्रदोषपूजा करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात भक्तगण उपस्थित होते. बीडच्या या चातुर्मासाकडे महाराष्ट्र मधून शिष्यगण दाखल होत आहेत. मोठ्या भक्ती भावाने सेवा करत आहे. दर्शनासाठी आणी प्रसादासाठी रोज पाच हजार भाविक बीड मध्ये येत आहेत.



























































