
सामना ऑनलाईन । पाटणा
बिहारमध्ये पावासाने कहर केला असून अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच शेकडो लोक विस्थापित झाले आहेत. परंतु या पुराच्या पाण्यात काही अतिउत्साही लोक टिक टॉक व्हिडीओ काढत आहेत.
Bihar: People seen clicking selfies, making videos from a bridge over an overflowing river and diving into the river, in Darbhanga. Locals say “We had never seen such flood. So we are taking selfies and making videos. People make videos and upload it on YouTube and TikTok.” pic.twitter.com/H9w7YpxwVi
— ANI (@ANI) July 31, 2019
दरभंगा जिल्ह्यातील एका नदीच्या पुलावर काही तरुण सेल्फी काढत आहेत. काहीजण या पाण्यात उडी मारून टिक टॉक व्हिडीओ काढत आहे. पुराचे पाणी असल्यामुळे त्यांच्या जिवितीला धोकाही होऊ शकतो. परंतु एवढ्या पाण्याचा पूर आपण कधीच पाहिला नाही अशी प्रतिक्रिया यातीला काही तरुणांनी दिली म्हणून आम्ही सेल्फी आणि व्हिडीओ काढत असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेकडे प्रशासनाने वेळीच लक्ष नाही दिले तर पुरात बुडून कुणाचा मृत्यूसुध्दा होऊ शकतो.




























































