नितीन गडकरी यांना पुन्हा भोवळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, सोलापूर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रगीत सुरू असतानाच केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली. घशाला इन्फेक्शन झाल्याने त्यांनी स्ट्राँग ऍण्टीबायोटिक्स औषध घेतले होते. त्यामुळेच त्यांना चक्कर आली असावी, असा डॉक्टरांचा अंदाज आहे.

आज विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी गडकरी दिल्लीहून सोलापूरला आले होते. कार्यक्रमाच्या समारोप्रसंगी राष्ट्रगीत सुरू असतानाच त्यांना भोवळ आली. गडकरी यांना लगेचच पाणी आणि औषध देण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांनी आपले नियोजित सर्व कार्यक्रम रद्द केले असून ते नागपूरला रवाना झाले.  याआधी डिसेंबरमध्ये राहुरीतील कार्यक्रमात आणि त्यानंतर एप्रिलमध्ये शिर्डीतील सभेत नितीन गडकरी यांना भोवळ आली होती.