
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बेकायदा कृत्य प्रतिबंधक सुधारणा विधेयक (UAPA) राज्यसभेत शुक्रवारी मंजूर झाले आहे. या विधेयकाच्या बाजूने 147 मते टाकण्यात तर विरोधात 42 मते पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत हे विधयेक मांडेल होते. त्यावर चर्चा झाल्यानंतर मतदान घेण्यात आले. या विधेयकानुसार दहशतवादाशी संबंध असलेल्या संस्था आणि व्यक्ती यांना दहशतवादी घोषित करण्याची तरतूद आहे. या विधेयकाला लोकसभेत आधीच मंजुरी मिळाली आहे.
Unlawful Activities (Prevention) Act(UAPA) amendment, 2019 passed in Rajya Sabha pic.twitter.com/jfttTZvdmE
— ANI (@ANI) August 2, 2019
विविध पक्षांनी हे विधेयक सिलेक्ट समितीकडे पाठवण्याची मागणी केली होती. त्याबाबतचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. प्रस्तावाच्या बाजूने 85 आणि विरोधात 104 मते पडली. त्यामुळे या विधेयकावर मतदान घेण्यात आले आणि विधेयकाला मंजुरी मिळाली.


























































