
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईतील चांदिवली परिसरातील म्हाडा कॉलनीत एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. या घटनेत तीनजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.त्यांनी बचाव कार्याला सुरुवात केली आहे. दोन दिवासापासून मुंबईत पाऊस पडत आहे. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच चांदिवली परिसरातील म्हाडा कॉलनी येथे एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे आणि मुंबईत संरक्षक भिंत कोसळल्याचा प्रकार घडला होता.























































