घरकुल घोटाळा प्रकरणात तारीख पे तारीख ;न्यायालयाची नाराजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

सामना ऑनलाईन । धुळे

गुरूवारी सकाळी संशयीतांच्या वकीलांनी माजीमंत्री सुरेश जैन आणि तत्कालीन नगराध्यक्ष जगन्नाथ वाणी हे वैद्यकीय कारणामुळे न्यायालयीन कामकाजावेळी उपस्थित राहु शकत नसल्याचे सांगितले. त्यावेळी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. पुढील तारखेस गैरहजर असल्यास समन्स बजावला जाईल, असे न्यायालयाने सांगितले.

जळगाव शहरातील घरकुल घोटाळा प्रकरणी अंतीम निकाल पुन्हा लांबणीवर गेला आहे. धुळे जिल्हा न्यायालयाने एक ऑगस्ट रोजी निकाल देण्यात येईल असे जाहीर केले. गुरूवारी सकाळी संशयीतांच्या वकीलांनी माजीमंत्री सुरेश जैन आणि तत्कालीन नगराध्यक्ष जगन्नाथ वाणी हे वैद्यकीय कारणामुळे न्यायालयीन कामकाजावेळी उपस्थित राहु शकत नसल्याचे सांगितले. त्यावेळी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. गुरूवारी निकाल असल्याने धुळे न्यायालयाच्या आवारात घोटाळय़ातील संशयीतांसह त्यांचे पाठीराखे मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.

जळगाव महापालिकेने शहरात झोपडट्टी निर्मुलन कार्यक्रमा अंतर्गत 1998 मध्ये घरकुल नसणाऱ्यांसाठी घरकुल बांधण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार 11 हजार 424 घरकुले बांधण्यास सुरूवात झाली. परंतु, ज्या जागेवर ही घरकुले उभारण्यात येत आहेत ही जागा जळगाव महापालिकेच्या मालकीची नाही. दिशाभुल करुन योजना राबविली जात आहे. घरकुल निर्मितीच्या कार्यक्रमात मोठय़ा प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला जात आहे अशी तक्रार 2001 मध्ये करण्यात आली. या प्रकरणी आरोप-प्रत्यारोप आणि चौकशीचा फेरा पुर्ण झाल्यानंतर कथित घरकुल घोटाळा प्रकरणी 2004 मध्ये 29 कोटी 59 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे, असा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या चौकशी अंती माजी मंत्री सुरेश जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, तत्कालीन नगराध्यक्ष प्रदीप रायसोनी, राज मयुर, जगन्नाथ वाणी या प्रमुखांसह एकुण 52 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. न्यायालनी कामकाज होत असतांना संशयीत 52 पैकी तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण फरार आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजावेळी 48 जणांची उपस्थिती राहत असे. धुळे जिल्हा न्यायालयाने एक ऑगस्ट रोजी निकाल देण्यात येईल असे सांगितले.

घरकुल घोटाळय़ातील संशयीत माजी मंत्री सुरेश जैन, जगन्नाथ वाणी वैद्यकीय कारणामुळे उपस्थित राहु शकणार नसल्याचे त्यांच्या वकीलांनी सांगितले. परिणामी, न्यायालयाकडून अंतीम निकालासाठी 26 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.