प्रियदर्शन म्हणतोय जागो मोहन प्यारे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अभिनेता सिद्धार्थ जाधवला वेगळी ओळख दिलेले मराठी रंगभूमीवरील गाजलेले नाटक ‘जागो मोहन प्यारे’ आता चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. प्रियदर्शन जाधव याने या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन केले आहे. स्वरूप रिक्रिएशन अॅण्ड मीडिया, लोकीज स्टुडिओ आणि अमेय विनोद खोपकर यांनी हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. मूळ नाटकात मोहनची भूमिका केलेला अभिनेता सिद्धार्थ जाधवसह अनिकेत विश्वासराव आणि दीप्ती देवू यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले असून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. नक्या कर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.