
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा ठप्प झाला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने जगबुडी नदीवरील पूल शनिवारी सकाळी 10.30 वाजेपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. जगबुडी नगरीच्या पाण्याची पातळी 8.40 मीटर एवढी झाली आहे. शुक्रवारी रात्री 11.30 वाजता जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने जगबुडी पुलावरील वाहतूक पहाटेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. शनिवारी सकाळी जगबुडी पुलावरून एकेरी वाहतुक सुरु झाल्यानंतर पुन्हा 10.30 वाजता जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे जगबुडी पुलावरची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई- गोवा महामार्ग पुन्हा एकदा ठप्प झाला आहे.



























































