
सामना प्रतिनिधी, बीड
शिवसेनेत मेगा भरती नव्हे तर ‘स्कील’ भरती सुरू आहे, अशी स्पष्टोक्ती शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. शिवसेनेमध्ये काम पाहून प्रवेश दिला जातो, असे प्रतिपादनही आदित्य ठाकरे यांनी केले. बीड शहरातील अद्ययावत नव्या बसस्थानकाच्या कामाचा शुभारंभ आज आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.
बीड येथे जनआशीर्वाद यात्रेत बोलताना आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, परवा मुंबईत मला प्रश्न विचारला गेला, भाजप-शिवसेनेत सध्या मेगा भरती सुरू आहे. तेव्हा मी म्हणालो, शिवसेनेत मेगा भरती नव्हे तर स्कील भरती सुरू आहे. काम करणाऱयांना त्याचे काम बघूनच शिवसेनेमध्ये प्रवेश दिला जातो, असे ते म्हणाले. बीड जिह्याचे प्रवेशद्वार असणाऱया गंगामसला येथे आदित्य ठाकरे यांचे उत्स्फूर्त जंगी स्वागत करण्यात आले. तेथून पुढे ही यात्रा माजलगावकडे निघाली. माजलगाव, तेलगाव, बावी तांडा, वडवणी, घाटसावळी, ढेकणमोहा येथे आदित्य ठाकरे यांचे प्रचंड स्वागत करण्यात आले. बीडमध्ये केएसके महाविद्यालयात त्यांचा आदित्य संवाद हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी तब्बल पाच हजार महिला आणि युवती उपस्थित होत्या. त्यानंतर बीड शहरातील 13 कोटी रुपयांच्या अद्ययावत आणि सुसज्ज नव्या बसस्थानकाच्या कामाचा शुभारंभ आज युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाला.
आदित्य ठाकरे म्हणाले, सदैव जनतेची सेवा करणाऱया एसटी बसस्थानकाचा शुभारंभ माझ्या हातून होतो आहे हे माझे भाग्य होय. यावेळी अध्यक्षस्थानी परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, संपर्कप्रमुख आनंद जाधव, आ.राहुल पाटील उपस्थित होते.
50 वर्षांत जे झाले नाही ते साडेचार वर्षांत करून दाखवले
परिवहनमंत्री दिवाकर रावते म्हणाले, आज बीड जिह्यातील सर्वात मोठय़ा बसस्थानकाचा शुभारंभ होत आहे. निश्चितच ही समाधानाची बाब आहे. गेल्या 50 वर्षांत जे झाले नाही ते साडेचार वर्षांत आम्ही करून दाखवले. परिवहन खात्याची असंख्य कामे सध्या सुरू आहेत. कोकणामध्ये 29, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 70, मराठवाडय़ात 30, विदर्भात 66 बसस्थानकांची कामे सुरू आहेत. एसटी बसेसचे काळवंडलेले स्वरूप बदलत आहे. गरिबांची ही एसटी आता रूपडं बदलत आहे. 90 बसस्थानकांची रंगरंगोटी झाली आहे.
स्त्री ही देशाची ताकद आहे
मी शेतकऱ्यांशी बोललो, सामान्य जनतेशी बोललो, विद्यार्थ्यांशी बोललो, आज तुमच्याशी बोलण्यासाठी आलो आहे. मला आनंद होत आहे, आज माझ्यासोबत तुमचे आदेश बांदेकर भाऊजी सुद्धा आहेत. महिला, मुली देशाची ताकद आहे. मात्र या ताकदीचा आपल्याला परिचय होत नाही. नवा महाराष्ट्र घडवायचा आहे ना.. मग त्यासाठी महिलांचा आवाज सर्वात पुढे राहिला पाहिजे. यासाठीच तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मी येथे आलो आहे, असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. जनआशीर्वाद या दुसऱया टप्प्यातील यात्रेने बीड जिह्यात प्रवेश केला. आज बीडमध्ये केएसके महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित आदित्य संवाद या कार्यक्रमामध्ये त्यांनी महिला आणि युवतींशी संवाद साधला. पाच हजारांपेक्षा जास्त महिला आणि युवती या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
एक हजार किलोचा हार बघून आदित्य ठाकरे झाले अवाक्
रविवारी सकाळपासून शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बीड जिह्यात आहेत. ठिकठिकाणी प्रचंड उत्साहात त्यांचे स्वागत केले जात आहे. तुफान गर्दी त्यांना पाहण्यासाठी होत आहे. बीडमध्ये तर माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, माजी जिल्हा युवाधिकारी अभिजित बरिदे यांनी तब्बल एक हजार किलोचा हार आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी आणला. हा हार उचलणे म्हणजे महादिव्य म्हणून हार घालण्यासाठी क्रेनची व्यवस्था केली होती. तो एक हजार किलोचा हार बघून आदित्य ठाकरे अवाक झाले. हा हार बनविण्यासाठी तीन जिह्यांतून फुले आयात करण्यात आली होती. या हारामध्ये पाच हजार गुलाबाची फुले आहेत. क्रेनच्या माध्यमातून हा हार आदित्य ठाकरे यांच्या गळ्यात घालायचा होता. मात्र, मी केवळ हाराला हात लावतो तो मला पोहचला, असे म्हणत अवाक् झालेल्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अनिल जगताप यांना बोलावून तुम्ही मला बुके द्या, हार पोहचला असे म्हटले.
बंजारा समाजाच्या महिलांनी ताफा अडवून केले औक्षण
जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्कच जिह्यांत, तालुक्यांत, गाकागाकांत शिकसेना नेते तथा युकासेना प्रमुख आदित्य ठाकरे जात आहेत. त्यांची निकेदने, अडचणी जाणून घेत आहेत ही जनआशीर्काद यात्रा आज बीड जिह्यातील कडकणी तालुक्यात येत असताना बावी तांडा येथील बंजारा समाजाच्या महिलांनी अचानक ताफा अडवून औक्षण करत समाजाच्या मागण्यांचे निकेदन दिले.





























































