
सामना ऑनलाईन । मुंबई
‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘पती, पत्नी और वो’ या सुपरहिट चित्रपटांमधून झळकलेली 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री विद्या सिन्हा यांनी प्रकृती चिंताजनक आहे. हृदयविकाराचा त्रास झाल्याने दोन दिवसांपूर्वी उपचारासाठी त्यांना जुहू येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. विद्या या 72 वर्षांच्या असून काही वर्षांपासून त्यांना हृदयविकार आणि फुफ्फुसांच्या आजाराने ग्रासले आहे. डॉक्टरांनी त्यांची अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला मात्र त्यांच्या नातेवाईकांनी अँजिओप्लास्टी करण्यास नकार दिला. विद्या यांचे दुसरे लग्न नेताजी भीमराव साळुंखे यांच्यासोबत झाले होते. पण त्यांनी साळुंखे यांच्याविरोधात मानसिक व शारीरिक छळाची तक्रार दाखल केली. काही महिन्यांतच त्यांचा घटस्फोट झाला. त्यांचे पहिले लग्न वेंकटेश्वर अय्यर यांच्यासोबत झाले होते. काव्यांजली, कुल्फी कुमार बाजेवाला या टीव्ही मालिकांमधील त्यांच्या कामाची खूप स्तुती झाली होती.

























































