
परभणीत जिल्हा बॅडमिन्टन असोसिएशनच्या वतीने वरिष्ठ आंतरजिल्हा व राज्यस्तरीय अजिंक्यपद बॅडमिन्टन स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर व महापौर मीनाताई वरपुडकर यांच्याहस्ते पार पडले. यावेळी पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, विरोधी पक्षनेते विजय जामकर, स्थायी समितीचे सभापती सुनिल देशमुख, आयोजक रवींद्र पतंगे-देशमुख, सुनील तुरूकमाने, लक्ष्मीकांत क्षीरसागर तसेच परभणी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
जिल्हा बॅडमिन्टन असोसिएशनच्या वतीने वरिष्ठ आंतरजिल्हा व राज्यस्तरीय अजिंक्यपद बॅडमिन्टन स्पर्धा शहरातील जिल्हा बॅडमिन्टन हॉल येथे स्पर्धेस प्रारंभ झाला. ही स्पर्धा रविवार, १८ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, या स्पर्धेसाठी राज्यातून सुमारे ३०० खेळाडू सहभागी होत आहेत. स्वातंत्र्यदिनी म्हणजेच गुरूवार, १५ रोजी सकाळी ११ वाजता आंतरजिल्हा स्पर्धेचे बक्षिस वितरण व वैयक्तिक स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार संजय जाधव, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला राठोड, शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील, जि.प. उपाध्यक्षा भावना नखाते, हेमंत जामकर, जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या उपस्थितीत होणार आहे. समारोप कार्यक्रमात रविवार, १८ ऑगस्ट रोजी दुपारी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, सुरेश देशमुख, अरूण लखानी, प्रदीप गंधे, उपमहापौर माजू लाला, भगवान वाघमारे, जाकेर लाला, मंगल मुद्गलकर, चंद्रकांत शिंदे उपस्थितीत राहणार आहेत. कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन विजय जामकर, सचिन अंबिलवादे, डॉ. श्याम जेथलिया, रवींद्र देशमुख, सुधीर मांगूळकर, आशिष शहा, विजय मुंदडा, रफीक बोधान, विनोद जेठवाणी, नरेंद्र झांजरी, पांडुरंग कोकड, भगवान खैराजानी, उन्मेश गाडेकर, सुनील देशमुख, इंद्रजित वरपूडकर आदींनी केले आहे.





























































