गणेशोत्सव आला 15 दिवसांवर! अकरा हजारपैकी तीन हजार मंडळांकडून परवानगीसाठी अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सव अवघ्या 15 दिवसांवर आला असताना मुंबईतील 11 हजार मंडळांपैकी आतापर्यंत फक्त 2620 मंडळांनीच पालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केले आहेत. यातील 1005 मंडळांना परवानग्या देण्यात आल्या असून 189 जणांना विविध कारणांमुळे परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे शिल्लक मंडळांनी तातडीने परवानगीसाठी अर्ज करावा, असे आवाहन पालिका आणि गणेशोत्सव समन्वय समितीने केले आहे.

गणेशोत्सक मंडळांना गेल्या दोन वर्षांपासून पालिकेकडून ऑनलाइन परवानगी दिली जात आहे. यामध्ये मंडळांना आपापल्या किभाग कार्यालयात मंडप परकानगीसाठी अर्ज कराका लागतो. अर्ज केल्यानंतर संबंधित किभाग कार्यालयाकडून पोलीस, ट्रफिक आणि अग्निशमन दल किभागाकडून आकश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र आल्यानंतरच मंडळांना परकानग्या दिल्या जातात. या वर्षी 15 जूनपासून परवानगी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र आतापर्यंत फक्त 2620 मंडळांनीच परवानगीसाठी अर्ज केले आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह समन्वय समितीच्या माध्यमातून मंडळांना लवकरात लवकर अर्ज करून परवाना घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अशी आहे सद्यस्थिती
– एकूण मंडळे – 11 हजार
– आलेले एकूण अर्ज – 2620
– छाननी पूर्ण – 2198
– परवानगी दिल्या – 1005
– परवानगी नाकारल्या – 189
– कार्यवाही सुरू – 1004

असा करा अर्ज
पालिकेच्या www.mcgm.gov.in या वेबपोर्टलवर मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये अर्ज करण्याची सुविधा आहे. या पोर्टलवर ऑनलाइन सेवा, परीरक्षण, गणपती-नवरात्रीच्या टॅबखालील Ganapati/Navratri Mandap Application मध्ये नमूद विविध लिंकवर अर्ज करता येणार आहे.

परवानगीसाठी 24 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
ऑनलाइन परवानगीसाठी अर्ज करण्याची मुदत 19 ऑगस्ट होती, मात्र अर्ज करताना मंडळांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे मंडळांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालिकेने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी गणेशोत्सव समन्वय समिती, मंडळे आणि विविध संघटनांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रशासनाला परवानगीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्याचे निर्देश दिले. महापौरांच्या सूचनेनुसार पालिका प्रशासनाने मंडळांना परवानगीसाठी 24 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देत असल्याचे जाहीर केले आहे.