गणपतीपुळ्याच्या समुद्रात बुडून तिघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणपतीपुळ्याच्या समुद्रात डुंबण्याचा आनंद घेण्यासाठी उतरलेल्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे.  हे तिघेही जण मूळचे कोल्हापूरचे रहिवासी असल्याचं सांगण्यात आले आहे. मृत्यूमुखी पडलेले तिघेही जण हे कसबा बावडा, कोल्हापूर इथल्या रहिवासी आहे. काजल मचले (वय 17 वर्षे) आणि सुमन मचले (वय 25 वर्षे) आणि उमेश बागडे (वय 28 वर्षे) अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांसह किसन मचले, निर्मला मचले,पूजा बागडे, ऐश्वर्या मिनेकर हे देखील बुडाले होते, मात्र त्यांना वाचवण्यात  स्थानिक सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षकांना यश आले आहे.

मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी काजल मचले आणि सुमन मचले यांचे मृतदेह आधीच सापडला होते. उमेश बागडे याचा मात्र शोध लागत नव्हता. बारा वाजण्याच्या सुमारास त्याचाही मृतदेह सापडला असून तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या आधी हे पर्यटक किनाऱ्यावर गेले होते. यावेळी किनाऱ्यावर फार कुणी नव्हते. जीवरक्षकांची ड्युटी सात वाजता सुरु होते तर दुकानदारही आठ वाजल्यानंतर दुकाने उघडतात त्यामुळे पर्यटक बुडाले तेव्हा त्यांना लवकर मदत मिळाली नाही