
>> नीलिमा प्रधान
मेष- वर्चस्व वाढेल
सूर्य-चंद्र त्रिकोण योग, शुक्र-मंगळ युती होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला दगदग होईल. नोकरी सुधारणा होईल. वर्चस्व वाढवता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्रतिष्ठा मिळेल. योग्य डावपेच तयार करून त्याचा वापर करा. लोकसंग्रह वाढेल. खंबीर मनाने सर्वच क्षेत्रांत वाटचाल करता येईल. शुभ दिनांक ः 23, 24
वृषभ- नावलौकिक वाढेल
चंद्र-बुध त्रिकोण योग, शुक्र-मंगळ युती होत आहे. आत्मविश्वासात भर पडेल. उत्साह वाढवणारी व्यक्ती सहवासात येईल. व्यवसायाला कलाटणी मिळेल. महत्त्वाची कामे रेंगाळतील. दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभेल. कौटुंबिक ताण कमी होईल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत नावलौकिक मिळेल. शुभ दिनांक ः 19, 20
मिथुन- शेअर्सचा अंदाज येईल
सूर्य-चंद्र त्रिकोण योग, शुक्र-मंगळ युती होत आहे. व्यवसायात बस्तान बसेल. थोरामोठय़ांची गुंतवणूक होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. नोकरीत बदल होईल. तुमचे वर्चस्व चांगलेच वाढेल. कौटुंबिक सौख्य मिळेल. क्रीडा, नाटय़-चित्रपटक्षेत्रांत गुणांची कदर होईल. पुरस्कार व लाभ मिळेल. शुभ दिनांक ः 19, 20
कर्क- मानसन्मान वाढेल
बुध-गुरू त्रिकोण योग, चंद्र-मंगळ केंद्रयोग होत आहे. व्यवसायात मोठय़ा प्रमाणात काम मिळेल. नोकरीत मनाप्रमाणे बदल होईल. राजकीय गैरसमज दूर करा. मानसन्मानात भर पडेल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत विशेष यश मिळेल. शुभ घटना घडतील. कल्पनाशक्तीला प्रेरणा मिळेल. शुभ दिनांक ः 19, 20
सिंह- प्रगतीची संधी सोडू नका
बुध-नेपच्यून षडाष्टक योग, शुक्र-मंगळ युती होत आहे. तुम्हाला मिळालेली प्रगतीची एकही संधी सोडू नका. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत सहकारी वर्गाचा विश्वास संपादन कराल. दिग्गज लोकांचा सहवास प्रेरणादायी ठरेल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत अलौकिक यश व आर्थिक लाभ मिळेल. शुभ दिनांक ः 21, 24
कन्या- रागावर ताबा ठेवा
बुध-गुरू त्रिकोणयोग, सूर्य-चंद्र केंद्रयोग होत आहे. व्यवसायात दगाफटका होऊ शकतो. प्रतिष्ठा बिघडवण्याचा प्रयत्न होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत मनस्ताप होईल. प्रवासात सावध राहा. स्वतःचे स्थान डळमळीत होऊ देऊ नका. गैरफायदा घेणारे लोक आजूबाजूला असतात. रागावर ताबा ठेवा. शुभ दिनांक ः 23, 24
तूळ- लाभदायी घटना घडतील
सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, शुक्र-मंगळ युती होत आहे. नोकरी-व्यवसायात मनाप्रमाणे सुधारणा करा. फायदेशीर घटना घडतील. मातब्बर लोकांचा परिचय प्रगतीला कारणीभूत ठरेल. उत्साह व आत्मविश्वास याचा उपयोग राजकीय-सामाजिक क्षेत्रांत होईल. दूरदृष्टिकोन ठेवा. मानसन्मान लाभेल. शुभ दिनांक ः 21, 22
वृश्चिक- सुखद घटना घडतील
सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, शुक्र-मंगळ युती होत आहे. नवीन परिचय प्रेरणादायी ठरेल. नोकरी प्रमोशन, अधिकार मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत अभिनव कार्य केल्याने सर्वत्र कौतुक होईल. कुटुंबात सुखद घटना घडेल. तुमचे वर्चस्व मान्य होईल. विरोध सहन करून संयमाने पुढे जाल. शुभ दिनांक ः 19, 20
धनु- व्यवसायात सुधारणा होईल
सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, शुक्र-मंगळ युती तुमचे औदासिन्य घालवणार आहे. दिशा मिळेल. व्यवसायात सुधारणा होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत झालेले गैरसमज दूर करून वेगाने पुढे जाता येईल. लोकप्रियता मिळेल. प्रेरणा देणारी, व्यक्ती भेटेल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत नावलौकिक मिळेल. शुभ दिनांक ः 18, 19
मकर- जबाबदारी वाढेल
सूर्य-चंद्र षडाष्टक योग, चंद्र-बुध त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात गोंधळून न जाता आत्ताच जम बसवण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येक दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. नोकरीत जबाबदारी वाढेल. कुटुंबात चिंताजनक प्रसंग ओढवेल. कोर्टाच्या कामात दिलासा मिळेल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत कौतुक होईल. शुभ दिनांक ः 19, 20
कुंभ- चौफेर यश लाभेल
सूर्य-गुरू त्रिकोणयोग, शुक्र-मंगळ युती होत आहे. तुमच्या क्षेत्रात चौफेर यशाची घोडदौड कराल. व्यवसाय-नोकरीत तुम्ही योग्य निर्णय घ्या. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्राबल्य दिसेल. विचारांना चालना मिळेल. कुटुंबात सुखद घटना घडेल. नवीन खरेदी होईल. चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत नवीन कार्य कराल. शुभ दिनांक ः 19, 20
मीन- समस्या वाढवू नका
सूर्य-चंद्र षडाष्टक योग, बुध-गुरू त्रिकोणयोग होत आहे. तुमचे वक्तव्य फारच मोलाचे ठरेल. सहनशीलता ठेवा. चातुर्याने, प्रेमाने बोला. समस्या सुटेल. समस्या वाढवू नका. नोकरीत-व्यवसायात नवीन संधी मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्रतिष्ठा मिळेल. कुटुंबात समतोल ठेवा. शुभ दिनांक ः 22, 24



























































