
धुवांधार पावसामुळे दिव्यातील असंख्य चाळींमध्ये सात ते आठ फूट पाणी शिरून अक्षरशः होत्याचे नव्हते झाले. हजारो पूरग्रस्तांच्या संसाराचा जणू दिवाच विझला. मात्र शिवसेनेने धाव घेऊन या पूरग्रस्तांच्या संसाराचा ‘दिवा’ पुन्हा लावला आहे. गरजूंना तांदूळ, डाळी, साखर, मसालेपासून ते अगदी चहा पावडरपर्यंत सर्व प्रकारची मदत केल्याने त्यांचा संसार उभा राहिला आहे. एवढेच नव्हे तर यापुढेही पूरग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी केला आहे.
4 ऑगस्ट रोजी ठाण्यात ठाणे शहर व परिसरात प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे दिवा गाव, बंदरआळी, सुरेश नगर, शिवशक्तीनगर, सिद्धिविनायक गेट, रिलायन्स टॉवर, बीआरनगर, साबे या भागात राहणाऱया रहिवाशांची दैना उडाली. पाण्याच्या लोंढेच्या लोंढे घरात घुसल्याने वह्या, पुस्तके, खुर्च्या, कपाटे, गाद्या, भांडीकुंडी सारे वाहून गेले. या रहिवाशांना मदत करण्यासाठी शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी पुढाकार घेतला. ‘शिव सहाय्यक मदतकार्य’ या उपक्रमांतर्गत हा मदतयज्ञ करण्यात आला.
शिवसेना नेहमीच संकटकाळात मदत करण्यासाठी पुढाकार घेत असते. येथील रहिवाशांच्या मदतीला धाव घेणे हे माझे कर्तव्य असल्याचे सुभाष भोईर यांनी सांगितले. विविध ठिकाणी मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, नगरसेवक शैलेश पाटील, माजी उपमहापौर शरद गंभीरराव, युवासेना पदाधिकारी सुमित भोईर, कविता गावंड, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, माजी नगरसेवक सुधीर भगत, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चेतन पाटील उपस्थित होते.
आठ ट्रक पोहोचले
कल्याण : महापुराने अनेकांचे संसार पाण्यात गेल्याकर सामाजिक बांधिलकी जपत शिकसेना पूरग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. पूरग्रस्त कोल्हापूर, सांगलीमध्ये कल्याणमधून संसारोपयोगी साहित्याचे आठ ट्रक मदत पोहच झाली. शहरप्रमुख किश्कनाथ भोईर, सहसंपर्कप्रमुख शरद पाटील, नगरसेकक नीलेश शिंदे, सचिन बासरे, अरुण निंबाळकर, अजित पाटील, पोपट जाधक, सुधाकर निंबाळकर यांच्यासह शिकसैनिक मदतकार्यात कार्यरत होते. शिकसेनेच्या मदतीमुळे पूरग्रस्त बांधवांनी कृतज्ञता क्यक्त केली.






























































