
नगरमधील जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी येथील जात पतडताळणी कार्यालयातील विधी अधिकारी अविनाश मगर याला 15 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहात पकडले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
तक्रारदारांच्या पत्नीचे ओबीसी कुणबी प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्राचे काम करुन देऊन प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी विधी अधिकारी अविनाश मगर यांनी तक्रारदारांकडे 15 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या बाबतची तक्रार लाचलुपत प्रतिबंधक विभागाकडे आल्यानंतर पथकाने सापळा रचुन जात पडताळणी कार्याल्याच्या रेव्हीन्यू सोसायटीच्या तळजल्यावर तक्रारदार यांना जात वैधता प्रमाणपत्र देऊन अरोपी मगर यास पंचासह 15 हजार रुपयांची लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षिक हरीष खेडकर, पोलीस निरीक्षक शाम पवरे, दिलीप करांडे, तन्वीर शेख, प्रशांत जाधव, रमेश चौधरी, राधा खेमणर, अशोक रक्ताटे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.



























































