आठवड्याचे भविष्य रविवार 1 ते शनिवार 7 सप्टेंबर 2019

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलिमा प्रधान

मेष – तणाव कमी होतील
सूर्य-मंगळ युती, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. श्री गणेश पूजनात मनाची एकाग्रता करावी लागेल. राजकारणात नव्या पद्धतीने कार्य आरंभ करता येईल. लोकांचा संग्रह तयार करा. नोकरीत वरिष्ठांच्या बरोबरीने काम करण्याची वेळ येईल. कुटुंबातील तणाव कमी होईल. कलाक्षेत्रात नवे परिचय होतील. शुभ दिनांक – 3, 4

वृषभ – प्रेणादायी घटना घडेल
सूर्य-बुध युती, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. श्री गणेशाचे आगमन तुम्हाला उत्साह देणारे ठरेल. व्यवसाय व नोकरीत चांगला बदल होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मान-प्रतिष्ठा मिळेल. नाटय़-चित्रपट क्रिडाक्षेत्रात महत्त्वाचे पाऊल उचलाल. प्रेरणा देणारी घटना घडेल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. शुभ दिनांक – 1, 2

मिथुन – कार्याला वेग लाभेल
सूर्य-चंद्र लाभयोग, बुध-मंगळ युती होत आहे. व्यवसायाला चांगली कलाटणी मिळेल. मोठे कंत्राट मिळेल. राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. दिग्गज लोकांच्या सहवासाने कार्याला वेग प्राप्त होईल. सामाजिक क्षेत्रात, सर्वांच्या सल्ल्याने निर्णय घ्या. कौटुंबिक प्रश्न मार्गी लागेल. शुभ दिनांक – 1, 2

कर्क – कामाचे कौतुक होईल
सूर्य-बुध युती, चंद्र-शुक्र लाभयोग तुमच्या कार्याला सिद्धी देईल. श्री गणेशाचे आगमन तुम्हाला दिशादर्शक ठरेल. व्यवसायात जम बसेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या योजना लोकांपर्यंत पोहोचतील. कुटुंबात सुखद वातावरण राहील. नोकरीत बढती मिळेल. शुभ दिनांक – 2, 5

सिंह – व्यवसायात सुधारणा होईल
सूर्य-मंगळ युती, शुक्र-नेपच्यून प्रतियुती होत आहे. श्री गणेशाच्या आगमनाची तयारी मनाप्रमाणे होईल. प्रत्येक दिवशी यशाची नवी पायरी चढाल. व्यवसायात सुधारणा होईल. नोकरीत प्रभाव पडेल. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात मनाप्रमाणे घटना घडतील. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शुभ दिनांक -2, 3

कन्या – रागावर ताबा ठेवा
चंद्र-गुरू लाभयोग, बुध-मंगळ युती होत आहे. श्रीगणेशाच्या आगमनाने पूजनाने तुमच्यावरील संकट निवारण होईल. मनाचे सामर्थ्यच उपयोगी पडेल. रागावर ताबा ठेवा. राजकीय क्षेत्रात खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होईल. परिस्थितीचा नीट अभ्यास करा. कोणताही व्यवहार सावधपणे करा. शुभ दिनांक – 2, 3

तूळ – प्रगतीकारक घटना घडेल
बुध-मंगळ युती, सूर्य-बुध युती होत आहे. श्री गणेशाच्या पूजनाची तयारी करताना शांत रहा. व्यवसायात वाढ होईल. राजकीय क्षेत्रात प्रभाव वाढेल. सामाजिक कार्यात काही प्रश्न वादग्रस्त ठरू शकतात. रेंगाळलेली कामे होतील. नोकरीत प्रगतीकारक घटना घडेल. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात पुरस्कार मिळेल. शुभ दिनांक ः 5, 6

वृश्चिक – शेअर्सचा अंदाज येईल
सूर्य-बुध युती, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. श्री विघ्नहर्ता गणेशाचे पूजन यथासांग पूर्ण कराल. तुमच्या प्रत्येक कार्याला गती मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याची व्याप्ती वाढवता येईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. ठरवलेली कामे होतील. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. शुभ दिनांक – 2, 5

धनु- नवे अधिकार लाभतील
बुध-मंगळ युती, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. विघ्नविनाशक श्री गणेशाचे आगमन तुम्हाला नवी प्रेरणा देणारे ठरेल. व्यवसायातील पीछेहाट कमी होईल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुम्हाला नवे अधिकार लाभतील. मात्र सर्वांच्या विचारानुसार वागा. कुटुंबातील समस्या कमी होतील. शुभ दिनांक – 1, 2

मकर – निर्णयात सावधगिरी बाळगा
चंद्र-गुरू लाभयोग, सूर्य-मंगळ युती होत आहे. श्री गणेशाच्या कृपेने तुमच्यावरील संकट टळू शकेल. क्षेत्र कोणतेही असो, तुम्हाला सावधपणे निर्णय घ्यावयाचा आहे. व्यवसाय, नोकरीत दिशाभूल होऊ शकते. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठाrत व्यक्ती तुमचे कौतुक करतील. घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. शुभ दिनांक – 1, 2

कुंभ – वर्चस्व सिद्ध कराल
सूर्य-बुध युती, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. व्यवसाय-नोकरीत तुमचा प्रगतीचा घोडा वेगाने धावेल. राजकीय – सामाजिक क्षेत्रात मान-प्रतिष्ठा वाढेल. नेते, सहकारी यांचा सहयोग मिळेल. राग वाढवणारी घटना घडेल. तुमच्या क्षेत्रात तुम्ही वर्चस्व सिद्ध कराल. पुरस्कार, लाभ, सन्मानाने उत्साहित व्हाल. शुभ दिनांक – 3, 5

मीन – प्रसंगावधान राखा
चंद्र-गुरू लाभयोग, सूर्य-मंगळ युती होत आहे. श्री गणेश कृपा तुमचे मन स्थिर ठेवेल. व्यवसायात तडजोड करण्याची वेळ येईल. विरोधक अडचणी आणतील. कमी लेखण्याचा प्रयत्नही होईल. राजकारणात प्रसंगावधान ठेवा. परिस्थितीचे निरीक्षण करा. कोणताही प्रश्न प्रतिष्ठsचा करू नका. शुभ दिनांक – 5, 6