
आज भांडूप कांजूर स्थानकादरम्यान रुळांवर तडे गेले होते. ही बाब भाजी लागवड करणार्या व्यक्तीच्या निदर्शनास आल्यामुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले. गणेश चौहान असे या व्यक्तीचे नाव आहे.
रविवारी 10 ते 10.30 च्या सुमारास मध्य रेल्वेवरील भांडूप कांजूर दरम्यान रेल्वे रुळांवर तडे गेले. तेव्हा त्या रुळावरून येणार्या लोकलला गणेश चौहानने थांबवले व रेल्वे रुळाला तडे गेल्याचे सांगितले. त्याच्या या कामगिरीमुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले. गणेश चौहन हा याच मार्गादरम्यान भाजी लावून उदरनिर्वाह करतो. त्याच्या या कामगिरीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.






















































