पाकड्यांकडून शस्त्रसंधी उल्लंघन सुरुच; लष्कराचे सडेतोड प्रत्युत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकड्यांच्या कुरापती सुरुच असून पाकिस्तानी लष्कराने रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू कश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात गोळीबार केला आहे. हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांनी पाकिस्तानच्या कुरापतीला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. पूंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमध्ये गुरुवारी दुपारी 11.30 वाजता पाकिस्तानकडून मोर्टार डागण्यात आल्या. तसेच लहान पल्ल्याच्या शस्त्रांनी गोळीबार करण्यात आला. रोजौरी जिल्ह्यातही पाकिस्तानकडून बुधवारी विनाकराण मोर्टार डागण्यात आल्या होत्या. पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला हिंदुस्थानी लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. राजौरीच्या सुंदरबनी सेक्टरमध्ये दुपारी 3.45 मिनिटांनी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत मोर्टार डागल्या आणि लहान शस्त्रांनी गोळीबार केला.

ऑगस्ट महन्यात पहिल्या दोन आठवड्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना वाढल्या आहेत. या वर्षात जुलै महिन्यात सर्वाधीक शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना घडल्या आहेत, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.