नगर जिल्ह्यात दोन दिवसात दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. नगर तालुक्यातील कापुरवाडी येथील उच्चशिक्षीत शेतकऱ्याने सोमवारी गळपास घेऊन आत्महत्या केली. तर रविवारी रात्री पारनेर तालुक्यातील गारगुंडी येथील शेतकर्‍याने आत्महत्या केली आहे. नगर जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. महेश प्रभाकर कराळे ( वय 24, रा.कापुरवाडी, ता.नगर) तर नितीन प्रकाश झावरे (वय 38 रा.गारगुंडी ता.पारनेर) असे आत्महत्या केलेल्या शोतकऱ्यांचे नाव आहे.

कापुरवाडी येथे राहणारा महेश कराळे हा पीएचडी शिकलेला होता. आगडकाव रस्त्यावरील असलेल्या एका मंदीराच्या शेजारील झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. मंदीरात दर्शनाला आलेल्या एकाला तो लटकलेल्या स्थितीत दिसल्यावर त्याने ही माहिती पोलिसांना दिली. कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. महेशला जिल्हा रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषीत करण्यात आले. महेश यांच्या मागे आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. या प्रकरणी पोलिसांनी जिल्हा रुग्णायलयानुसार आकस्मक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास कॅम्प पोलिस करत आहेत.

पारनेर तालुक्यातील गारगुटी येथील नितीन झावरे या शेतकर्‍याने घरामध्ये पत्र्याच्या अ‍ॅगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन गावामध्ये पत्नीसह शेती करुन आपला उदरनिर्वाह करत हेाता. त्याची पत्नी मंदीरामध्ये नैवद्य ठेवण्यासाठी गेली होती. ती परत आल्यानंतर तिने दरवाजा वाजवला आतुन प्रतिसाद आला नाही. दरवाज उघडल्यावर नितीनने आत्महत्या केल्याचे दिसून आले. याबाबत माजी सरपंच भास्कर झावरे यांनी पारनेर पोलिसांनी माहिती दिली. याबाबतची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रविवार व सोमवार या दोन दिवसात दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नगर तालुक्यात सलग पाच दिवस आत्महत्येचे सुत्र सुरु झाल्यामुळे शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.