
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आणखी एका काँग्रेस नेत्याला अटक करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कर्नाटकातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री डी.के. शिवकुमार यांना अटक केली. गेल्या काही दिवसांपासून ईडीचे पथक त्यांची चौकशी करत होते.
Congress leader DK Shivakumar arrested by Enforcement Directorate (ED) under Prevention of Money Laundering Act (PMLA). pic.twitter.com/aYzYAmhGcQ
— ANI (@ANI) September 3, 2019
कर्नाटकचे माजी मंत्री डीके शिवकुमार यांना सोमवारी ईडीने तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले होते. गेल्या आठवड्यात शुक्रवारी आणि शनिवारी 13 तासांपेक्षा अधिक काळ त्यांची चौकशी झाली होती. अखेर मंगळवारी सायंकाळी त्यांना अटक करण्यात आली. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
अटकेनंतर ट्वीट
शिवकुमार यांनी अटकेनंतर ट्वीट करत भाजपवर टीका केली आहे. भाजप आपल्या मिशनमध्ये यशस्वी झाल्याचे त्यांनी म्हटले. तसेच मी कोणताही गुन्हा केला नसल्याचेही ते म्हणाले.
Congress leader DK Shivakumar tweets ‘I congratulate my BJP friends for finally being successful in their mission of arresting me. The IT & ED cases against me are politically motivated&I’m a victim of BJP’s politics of vengeance & vendetta.’ He has been arrested by ED under PMLA pic.twitter.com/FFBl4XxeJc
— ANI (@ANI) September 3, 2019
नोटाबंदीनंतर ईडीच्या रडारवर
2016 मध्ये लागू करण्यात आलेल्या नोटाबंदीपासून शिवकुमार हे आयकर विभाग आणि ईडीच्या रडावर आहेत. 2 ऑगस्ट, 2017 रोजी आयकर विभागाच्या तपासामध्ये त्यांच्या दिल्लीतील फ्लॅटमध्ये 8.59 कोटींची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली होती. यानंतर शिवकुमार आणि त्यांच्या चार साथीदारांवर आयकर कायदा 1961 अंतर्गत कलम 277 आणि 278 अन्वये, तसेच भादवि. कलम 120 (बी), 193 आणि 199 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आयकर विभागाच्या आरोपपत्रानुसार ईडीने शिवकुमार यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल केला.




























































