
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गुरुवारी गणपती विसर्जनाच्यावेळी बोट उलटून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीमधल्या 5 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. भोपाळमधील खटलापूर घाटावर ही दुर्घटना घडली आहे. मध्य प्रदेशचे जनसंपर्कमंत्री पी.सी.शर्मा यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रूपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे.
PC Sharma, MP Minister on 11 dead after boat capsized in Bhopal this morning: The incident is really unfortunate. A compensation of Rs 4 lakh has been announced for the families of the deceased by the District Collector. Investigation will be done. pic.twitter.com/JWin2guDII
— ANI (@ANI) September 13, 2019
अतिरिक्त पोलीस अधीक्षक अखिल पटेल यांनी या दुर्घटनेबाबत बोलताना सांगितले की ‘या तलावामध्ये बुडणाऱ्या 5 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. प्रत्यक्षदर्शी आणि बचावलेल्यांच्या नातेवाईकांनी या बोटीमध्ये इतकेच लोकं होते’. या बोटीतील उरलेल्यांना जरी बाहेर काढले असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून या तलावामध्ये शुक्रवारी सकाळी शोधमोहीम राबवण्यात येणार आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.
Madhya Pradesh: 11 bodies recovered at Khatlapura Ghat in Bhopal after the boat they were in, capsized this morning. Search operation is underway. More details awaited. pic.twitter.com/mEMSJdzhE9
— ANI (@ANI) September 13, 2019
मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे इथल्या नद्या आणि तलावांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. गणपती विसर्जनासाठी जी बोट घेण्यात आली होती ती जुनी होती. या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त भाविक चढले होते. तलावात खोलवर गेल्यानंतर बोट उलटली आणि त्यात असलेले 16 जण बुडाले. यातील 11 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.


























































