
गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक तीनमजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. अहमदाबादच्या आमराईवाडीतील बंगलावाली चाळीत ही दुर्घटना घडली आहे. घटनास्थळी आपत्कालीन निवारण पथक पोहचले असून बचावकार्य सुरू आहे.
घटनास्थळी पोहचण्यात बचाव पथकाला अडचणी येत आहेत. तसेच पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. इमारत पूर्णपणे कोसळली असून ढिगारा हटवल्यानंतर खाली अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढता येईल, असे बचाव पथकाने सांगितले असून ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.


























































