आझम खानच्या रिसॉर्टची वीज तोडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या रिसॉर्टमधून वीज चोरी होत असल्याचे उघड झाल्यावर आज वीज विभागाने छापा मारून रिसॉर्टची वीज तोडली. वीज चोरीप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. छाप्यादरम्यान, रिसॉर्टमध्ये अनधिकृतपणे बोअरवेल खणल्याचेही समोर आले आहे. या आधी रामपूरमध्ये जौहर विद्यापीठासाठी शेतकऱ्यांकडून बळजबरीने जमीन हडपल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात 27 शेतकऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे.