
शिरोळ तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणीपात्रात वाढ होउन या दोन्ही नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे श्री क्षेत्र नरसोबाचीवाडी येथे या मोसमातील तिसरा दक्षिणीव्दार सोहळा पार पडला. सतत पडणाऱ्या पाऊसामुळे नदीची पातळीत मोठी वाढ होत असल्यामुळे नदीकाठच्या गावांची पुन्हा धास्ती वाढली आहे.
शिरोळ तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळं पंचगंगा आणि कुष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. तालुक्यातील शिरोळ,तेरवाड, राजापूर हे तिन्ही बंधारे पाण्याखाली गेले आहेत.तर श्री क्षेत्र नुसिंहवाडी येथील दत्त मंदिर मध्ये पाणी शिरले असून या वर्षातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा गुरुवारी रात्री संपन्न झाला.तर कुरुंदवाड-शिरोळ जुना रस्त्यावरील अनवडी नाला, कुरुंदवाड-शिरढोण पूलावर पाणी आल्याने येथील वाहतूक बंद झाली आहे. पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पात्रात वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांनी धास्ती घेतली आहे.




























































