वंचित बहूजन आघाडीची सत्तासंपादन महारॅली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वंचित बहूजन आघाडीच्यावतीने 8 सप्टेंबरपासून सत्ता संपादन महारॅली निघणार आहे. नागपूर येथील संविधान चौकातून याचा शुभारंभ होणार असून 18 सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे समारोप होणार असल्याची माहिती आघाडीच्या अ‍ॅड. अण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

8 सप्टेंबर रोजी नागपूर येथील संविधान चौकातून निघणार ही रॅली नागपूर, हिंगणा, सेलू, वर्धा, देवळी, राळेगाव, यवतमाळ, कळंब, बाभुळगाव, नांदगाव, चांदूर, अमरावती,भातकुली, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, खामगाव, मातोळा, बुलढाणा, चिखली, मेहकर, रिसोड, मालेगाव, वाशिम, सेलू, हिंगोली, कळमनूरी, हादगाव, अर्धापूर, नांदेड, पुर्णा, परभणी, मानवत, सेलू, परतूर, जालना, बनापूर, संभाजीनगर, गंगापूर, नेवासा, पाथर्डी, शिरुरकासार,बीड, वडवणी, धारुर, केज, अंबाजोगाई, रेणापूर, लातूर, मुरुड, तेर, धाराशीव, तूळजापूर, सोलापूर, मोहोळ, काळशिरस, इंदापूर, बारामती, जेजूरी, सासवड, हडपसर, पुणे, भोर, खंडाळा, लोणंद, फलटन, सातारा, कराड, इस्लामपूर, सांगली, मिरज, जयसिंगपूर, हातकणंगले, कोल्हापूर या मार्गाने जाणार आहे. 18 सप्टेंबर रोजी या रॅलीचा समारोप होणार आहे.

पोलिसांच्या कामाचे तास कमी करुन ते 8 तास करावेत, त्यामुळे तीनपट अधिक पोलीस भरती करता येईल, होमगार्ड यांना कायमसेवेत समाविष्ट करावे, शेतकऱ्यांच्या शेतीमालास हमी भाव देण्यासाठी प्रयत्न, अंगणवाडी सेविकांना इतर राज्याप्रमाणे मानधनामध्ये वाढ, आशा सेविकांच्या मानधनात वाढ, सुशिक्षीत बेरोजगारांना नोकऱ्यांमध्ये नवीन भरती प्रक्रिया करुन संधी देण्यात येईल, शक्य न झाल्यास रोजगार निर्मीती किंवा बेरोजगार भत्ता देण्यात येईल हे मुद्दे घेऊन ही रॅली निघणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी अ‍ॅड. मंचकराव डोणे, डॉ.अरविंद भातांब्रे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.