लातुरात बसमध्ये चढताना पर्समधील 3 लाख 60 हजार रुपयांचे दागीने पळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गौरीलक्ष्मीच्या सणासाठी मुलांसह गावी जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने महिलेची पर्स कापून त्यामधील 3 लाख 60 हजार रुपयांचे दागीने लंपास केले.

या चोरी प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गोपाळ बब्रुवान जांभळदरे (रा.गौर ता.)निलंगा यांनी तक्रार दाखल केली. मुलांच्या शिक्षणासाठी ते लातूर येथे राहत होते. गौरीलक्ष्मीच्या सणासाठी त्यांची पत्नी सुमेधा ही दोन मुलांना सोबत घेऊन जुन्या रेल्वेस्थानकाजवळील बसस्थानकामधून निलंगा जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना पर्स कापून त्यामधील 12 तोळ्याचे सोन्याचे दागीने (ज्यामध्ये 2 राणीहार, नॉन पॅन्डर, झुमके यांचा समावेश होता )ते लंपास केले. सुमारे 3 लाख 60 हजार रुपयांचा चोरी प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.