आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वात अनेक युवकांचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परभणी येथील प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक तीनमधील अनेक युवकांनी रविवारी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि युवासेनेत प्रवेश केला. यावेळी दलित आघाडीचे तालुकाप्रमुख सुभाष जोंधळे युवासेना उपशहर प्रमुख असलम शेख आणि शाखाप्रमुख अनिल वाघमारे यांची उपस्थिती होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाआरोग्य शिबीर, रोजगार महामेळावा, दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप तसेच शहर आणि ग्रामीण भागात अनेक विकास कामे करून आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विकासाचा नवा पॅटर्न निर्माण केला. त्यामुळे शिवसेनेत  दिवसेंदिवस प्रवेश घेणाऱ्या युवकांची संख्या वाढत आहे. याच अनुषंगाने परभणी येथील प्रभाग क्रमांक 2 मधील शेख तुराब, सय्यद रसूल, शेख अखिल, खान सलमान, सय्यद फतरु, साजीद पठाण, सय्यद सलमान आणि प्रभाग क्रमांक 3 मधील सुनील शिखरे, लक्ष्मण ठोंबरे, कृष्णा जाधव, गणेश सोनकांबळे, आकाश खरात, शेख तुराब, सतीश जोंधळे आदी युवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सर्व युवकांना भगवे रुमाल आणि शिवबंधन बांधून शिवसेनेत स्वागत केले.