US Open – झुंजवणाऱ्या खेळीनंतर नदाल ठरला विजेता, पटकावले 19वे ग्रँडस्लॅम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकन ओपनची पुरुष एकेरीची अंतिम फेरी चांगलीच रंगली. तब्बल पाच तास रंगलेल्या सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत स्पेनच्या राफेल नदालने यूएस ओपनच्या पुरूष एकेरी विजेतेपदावर आपले नाव कोरले. नदालने मेदवेदेवचा 7-5,6-3,5-7, 4-6, 6-4 असा पराभव केला. नदालचे हे 19वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. नदालने इटलीच्या माटियो बेरेटिनीचा पराभव करत यूएस ओपनच्या अंतिम फेरीत धडक दिली होती.

नदालने 27व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर आतापर्यंत 18 ग्रँडस्लॅम जिंकल्या आहेत. हे नदालचे 19वे ग्रँडस्लॅम आहे. यापूर्वी नदालने 2010, 2013 आणि 2017 मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे. सर्वाधिक ग्रँडस्लॅम मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत राफेल दुसऱ्या स्थानावर आहे. अजून एक ग्रँडस्लॅम पटकावल्यास नदाल रॉजर फेडररच्या 20 ग्रँडस्लॅमच्या विक्रमाशी बरोबरी करू शकेल.