
आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सोमवारी ट्विटरच्या माध्यमातून अटकेच्या कारवाईवर ‘टिवटिवाट’ केला. लोक विचारतात, आयएनएक्स प्रकरणाची शिफारस करणाऱ्या डझनभर अधिकाऱ्यांना अटक झाली नाही, मग तुम्हालाच अटक कशी काय झाली? यावर माझ्याकडे उत्तर नाही अशी नाराजी चिदंबरम यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली.
सध्या तिहार तुरुंगात असलेल्या चिदंबरम यांनी त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या वतीने ट्किटरकर पोस्ट टाकण्यास सांगितले होते. डझनभर अधिकाऱ्यांनी तुमच्यापर्यंत हे प्रकरण आणले. तुमच्याकडे या प्रकरणाची शिफारस केली त्यांना अटक का करण्यात आली नाही? केकळ या प्रकरणाकर अंतिम सही केली म्हणून तुम्हाला अटक करण्यात आलीय का? असे प्रश्न लोकांकडून किचारले जात आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याने काहीच चूक केले नाही. कुणाला अटक व्हावी असे मला वाटत नाही, असे ट्विट चिदंबरम यांनी केले.























































