अकरावी ऑनलाइन प्रवेशाची आज शेवटची संधी,मोहरमची सुट्टी असूनही मार्गदर्शन केंद्रे सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी 10 सप्टेंबरला शेवटची संधी असणार आहे. मोहरम असूनही अकरावी प्रवेशाची मार्गदर्शन केंद्रे सुरू राहणार असून अद्याप प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे.

10 सप्टेंबरला मोहरम असल्याने सार्वजनिक सुट्टी आहे. मात्र या दिवशीही विद्यार्थी अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. विद्यार्थी 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येईल. फेरपरीक्षा उत्तीर्ण, एटीकेटी सवलत मिळालेले तसेच अद्याप प्रवेश न घेतलेले विद्यार्थी ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. संबंधित विद्यार्थी, पालक मोहरमच्या दिवशीही मार्गदर्शन केंद्रांशी संपर्क साधू शकतात, असे सहाय्यक शिक्षण संचालक भास्कर बाबर यांनी स्पष्ट केले.